नगरपालिकेसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सुरूवातीला अर्धा पाऊणतास असलेल्या उत्साहानंतर शेवटपर्यंत मतदार केंद्रावर निरूत्साह दिसून आला. ४७ टक्के मतदारांनी पाठ फिरविली आहे. जालना शहरात २ लाख १२ हजार ७५५ मतदारांची नोंद आहे. रविवारी झालेल्या मतदानात १ लाख १३ हजार ३१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे तब्बल ९९ हजार ४४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. एकूण ५३.२६ मतदान झाले.
पालिकेच्या ३० प्रभाग व नगराध्यक्षपदासाठी मतदान शांततेत पार पडले. किरकोळ कुरबुर वगळता मतदानाला कोठेही गालबोट लागले नाही. शहर परिसरातील २६३ मतदान केंद्रावर सकाळी काही वेळ रांगा होत्या. त्यानंतर नागरिकांना मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. मतदान केंद्राबाहेर मतदारांऐवजी विविध पक्षांच्या प्रतिनिधींची गर्दी दिसून आली. जुना जालना भागातील सरस्वती भुवन, नग
