काका-पुतण्याच्या लढाईमुळे चर्चेत आलेल्या रायगड जिल्ह्यात रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत सुनिल तटकरे यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे रोहा नगरपालिकेची निवडणुक चर्चेत आली होती.
येथील १७ पैकी १३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेले संदीप तटकरे पराभूत झाले आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संतोष पोटफोड विजयी झाले आहेत.
