अंधेरी रेल्वे स्थानकात घुसली इनोव्हा कार

अंधेरी रेल्वे स्थानकात दुपारी एक विचित्र घटना घडल्यामुळे थोडा वेळ खळबळ उडाली होती रेल्वे स्थानकात चक्क इनोव्हा गाडी आली होती.

ती कोणत्या व्ही आय पी माणसाची नसून राजेश यादव या ही इनोव्हा गाडी चालवत अंधेरीच्या प्लॅटफॉर्म नंबर ६ वर आला होता, गाडी प्लॅटफॉर्मवर येताच रेल्वे पोलिसांनी त्यास हटकले आणि ताब्यात घेतले.

अधिक माहिती घेतली असता राजेशने आपल्या मालकाला विमानतळावर सोडून परत येताना तो रस्ता चुकला आणि सरळ तो अंधेरीच्या प्लॅटफॉर्म आला, त्यास त्वरित रेल्वे सुरक्षा रक्षाकांनी अटक करून रेल्वे कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे, मात्र अशी गाडी प्लॅटफॉर्म कशी आली, हा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *