‘अरुणा शानबागच्या निमित्ताने’ पुस्तकाचे प्रकाशन

केईएम रुग्णालयातील परिचारिकांनी अरुणा शानबाग यांची ४२ वर्षे केलेली सुश्रृषा म्हणजे एक मापदंड आहे. अरुणा आमच्या मनात आहे. पण, पुढच्या अनेक पिढ्यांना तिची आठवण राहावी म्हणून केईएम रुग्णालयात सुरू असलेल्या ‘परिचारिका प्रशिक्षण केंद्रा’ला ‘अरुणा शानबाग’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी परिचारिकांनी केली आहे.

शुक्रवारी केईएम रुग्णालयात ‘अरुणा शानबागच्या निमित्ताने’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ््यात बोलताना केईएमच्या स्कूल आॅफ नर्सिंगच्या प्राध्यापिका पूर्वा खंदारे यांनी नामकरण करण्याची मागणी केली. पुस्तक प्रकाशन सोहळ््याला अधिसेविका अरुंधती वेल्हाळ, अधिसेविका अनुराधा पराडे, डॉक्टर आणि रुग्णालयातील परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सुनिता कुलकर्णी व सीमा केतकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. पुस्तकातून गेल्या ४२ वर्षांतील परिचारिका क्षेत्राचा आढावा घेऊन त्यांचे प्रश्न मांडले आहेत. डॉ. रवी बापट, डॉ. प्रज्ञा पै, डॉ. गिरीष ओक, केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्यासह अरुणाची सेवा करणाऱ्या चंपामावशी, परिचारिकांशी लेखिकांनी संवाद साधला होता.

रुग्णालय सुरक्षेचे आश्वासन

गेल्या काही वर्षांत डॉक्टर, परिचारिकांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलत असल्याचे आश्वासन शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. अनिल ग्वालानी यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *