500 ची नोट दिल्याने भांडण, बदला घेण्यासाठी केला मुलीवर बलात्कार

24 – 500 ची जुनी नोट दिल्याने झालेल्या भांडणाच्या रागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदाऊन येथे घडली आहे. आरोपींनी आमच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती पीडित मुलीच्या घरच्यांनी दिली आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. पीडित मुलगी घरी एकटी असताना तिचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
‘पीडित मुलीचं कुटुंब शेणाच्या गोव-या विकण्याचा व्यवसाय करतं. सोमवारी आरोपी शेणाच्या गोव-या विकत घेण्यासाठी आले होते. त्यांनी 500 ची जुनी नोट दिली असता मुलीच्या पित्याने नोट स्विकारण्यास नकार दिल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली’, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजविर सिंह यांनी दिली आहे.
या भांडणाचा राग मनात धरुन त्यांच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे बलात्कारात सहभागी आरोपीदेखील अल्पवयीन असून नववीत शिकत आहे. घटनेनंतर मुलीने घरच्यांना यासंबंधी माहिती दिली. यानंतर लगेच पोलीस तक्रार करण्यात आली. आरोपी सध्या फरार असून पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी भांडणात सहभागी असलेल्या आरोपीच्या साथीदाराला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *