आपला आहार ऋतूनुसार असावा. सध्या थंडीचा मोसम आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला अत्यंत पोषक अशी फळे खावीत. प्रत्येक फळाचे गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण असते. ही फळे आरोग्यवर्धक आहेत.
चिंच :
– पिकलेली चिंच मलावरोधही दूर करते.
– पचन करणं, रुची वाढवणं हाही चिंचेचा औषधी गुणधर्म
– दारूची नशा उतरविण्यासाठी पिकलेली चिंच कोमट पाण्यात भिजवून, बारीक करावी आणि पाणी मिसळून त्यात थोडा गूळ विरघळून प्यायला द्यायचे. हृदयाची दाहकता, जळजळ कमी होते.
– पाय मुरगळला असेल तर चिंचेची ताजी पाने उकळून घेऊन ती त्या जागी लावायची. लगेच परिणाम जाणवतो.
– गळ्याला सूज आली असेल तर १० ग्रॅम चिंच घेऊन एक लिटर पाण्यात घालायची. त्यात थोडे गुलाबजल मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
आवळा :
– आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते.
– रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा म्हणून जास्त ओळख
– आम्लपित्त आणि अॅसिडिटी कमी होण्यास मदत.
– आपळा पित्तशामक असतो.
– केसांसाठी, डोळ्यांसाठी, त्वचेसाठीही फायद्याचा असतो.
– आवळ्यापासून च्यवनप्राशसारखी काही औषधेही तयार करतात
– वार्धक्य लांबवणं हे आवळ्याचं प्रमुख काम
– शरीराला टवटवीतपणा देतो, तारुण्य देतो.
– प्रेग्नंटच्यावेळी स्त्रीला उलटी आणि मळमळ वारंवार होत असते. अशा वेळी आवळा सुपारी, कँडी तसेच सरबत घ्यावे.
– नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते.
ऊस :
– ऊस हा पित्तशामक आहे.
– ऊस लघवीचे प्रमाण वाढवणारा असतो.
– मूतखडा वगैरे लघवीच्या संदर्भातले सगळे विकार ऊस दूर करतो.
– शरीरातील सर्व विषाक्त पदार्थ धुतले जातात.
– थंड गुणाचा आणि बलकारक असा ऊस असतो.
बोरे :
– बोरे अग्निप्रदीपक असतात.
– चवीला रुचकर, पचण्यास हलके असते. ते मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते,
– वातदोषास कमी करते, जुलाब थांबवते
– या रानफळांमधून व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

