नोटाबदलाचा हा माझ्या सरकारचा अंतिम कार्यक्रम नसून ती काळ्या पैशाच्या विरोधातील प्रदीर्घ लढ्याची सुरुवात आहे. या लढ्याचा फायदा गरीब व सर्वसामान्य माणसाला मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
हिवाळी अधिवेशनात भाजपाच्या संसदीय मंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, काळा पैसा, बनावट चलन आणि भ्रष्टाचारामुळे गरीब, कनिष्ठ मध्यम वर्गीय व मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसत आहे.
हा काळा पैसा सरकारचा मोठा शत्रू आहे. त्याचा नायनाट करून अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
