रंग उडालेल्या नोटांचा मनस्ताप

रंग उडालेल्या नोटांचा मनस्ताप

पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्यानंतर सरकारने चलनात नवीन २ हजारांच्या नोटा आणल्या आहेत. मात्र या नोटांचा रंग उडत असल्याने या नोटा स्वीकारण्याची मानसिकता अजून तयार झालेली नाही. सामान्य नागरिकांना मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चेंबूरमधील घाटला परिसरात राहणारे सागर मंथनवार यांनी चेंबूरमधील आयसीआयसीआय या बँकेतून शुक्रवारी दोन हजार रुपये काढले. मात्र दोन हजाराच्या दोन्ही नोटांचा रंग उडालेला आहे. नोटांच्या मधोमध असलेली तारेच्या पट्ट्यांवरील हिरवा रंग देखील उडाला आहे. त्यामुळे या नोटा बनवाट नोटांसारख्या दिसत असल्याने बाजारात त्या सहसा कोणी स्वीकारण्यास तयार होत नाही. मंथनवार यांनी चार तास रांगेत उभे राहून हे पैसे काढले होते. सध्या त्यांच्या खिशात पैसे असून देखील ते बाजारातून काहीही खरेदी करु शकत नाहीत. त्यातच बँकांमध्ये मोठी गर्दी असल्याने त्या नोटा बदलीही करता येत नल्याची माहिती त्यांनी  दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *