गोरेगाव परिसरात झोपडपट्टीला आग

मुंबईतील गोरेगाव भागातील झोपडपट्टीला आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात.

आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या चार गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना झाल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठं आर्थिक नुकसान झालंय. शॉक सर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *