पेट्रोल, टोल, सरकारी रुग्णालयात जुन्या नोटा चालणार

सरकारने पेट्रोल पंप, सरकारी रुग्णालय, रेल्वे, वीज बिले, मालमत्ता कर, दूध केंद्रे आदी ठिकाणी एक हजार आणि पाचशे जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत २४ नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री उशिरा अधिका-यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. टोलमाफीची मुदत १८ नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा अचानक बंद केल्यानंतर सर्वसामान्य माणसांची आर्थिक कोंडी झाली आहे. आपले दोन-चार हजार रुपये मिळविण्यासाठी लोकांना पाच-पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेषत: वृद्ध, अपंग, महिलांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे जनतेच्या संतापाचा कडेलोट होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, दूध केंद्र, टोल ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत १४ नोव्हेंबर होती ती वाढवून २४ नोव्हेंबपर्यंत वाढवली.पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली!

बँकांतून रक्कम काढण्याची मर्यादाही वाढविण्यात आली आहे. अगोदर एटीएममधून दिवसाला दोन हजार रुपये काढता येत होते. ते आता अडीच हजार रुपये काढता येणार आहेत. तर बँकेतून चार हजार रुपये काढता येणार होते, ते साडेचार हजार काढता येणार आहेत.

१८ नोव्हेंबपर्यंत टोलमाफी!

जुन्या नोटांचा तुटवडा, सुट्टे पैसे मिळत नसल्याने टोलमाफीची १४ नोव्हेंबरची मुदत १८ नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे. मात्र १८ नोव्हेंबरनंतर टोलवर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे.

अर्थमंत्रालयांचे बँकांना नवे आदेश

एटीएममधून आता २ हजार ऐवजी २,५०० रुपये काढण्याची मुभा.
बँक खात्यातून दिवसाला ४ हजाराऐवजी ४,५०० रुपयांच्या नोटा बदलता येणार.
दिवसाला बँक खात्यातून १० हजार रुपये काढण्याचे निर्बंध हटवले.
एका आठवडयात बँक खात्यातून २० हजारांऐवजी २४ हजार रुपये काढता येणार.
पेन्शनर्ससाठीची वार्षकि प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *