हर्णे बंदरात दोन दिवसांत शंभर कोटींची उलाढाल

देशभरात सर्वत्र पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचे व्यवहार बंद झालेले असताना हर्णे बंदरात मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. येथील मासळी विक्रेत्या महिलांसह मोठमोठे मत्स्य व्यवसायिक आणि मच्छीमार सहकारी संस्थांनी पाचशे-हजार नोटांचे व्यवहार सुरू ठेवून सर्वासमोर आदर्श ठेवला. मात्र या परिस्थितीचा गरफायदा घेत काळ्या पशाचं शंभर कोटी रुपयांचं ‘घबाड’ गेल्या दोन दिवसांत येथील मच्छीमारांना मोबदला म्हणून वितरित करण्यात आल्याची चर्चा आता सुरू आहे.

हर्णे बंदरात रोज एक कोटी रुपयांची उलाढाल होत असली तरी यापकी बहुतेक रक्कम मच्छीमारांना टप्प्याटप्प्याने दिली जाते. बंदरात मच्छीमारांनी आणलेला मासळीचा साठा मत्स्यव्यावसायिकांकडून उधारीवरच घेतला जातो आणि तो मुंबई, गोवा, कोची येथील कंपन्यांना रवाना केला जातो. संबंधित कंपन्यांकडून त्याचा मोबदला मिळाल्यानंतर एक-दीड महिन्यांत मच्छीमारांची रक्कम अदा केली जाते. हण्र बंदरात गेले अडीच महिने ही रक्कम मिळालेली नसल्याने येथील मच्छीमारांत नाराजी होती. पण गेल्या दोन दिवसांतच मच्छीमारांची सर्व थकबाकी अदा झाल्याने बंदरात दिवाळीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण हे सर्व व्यवहार पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमध्ये झाले असून आतापर्यंत उधारीवर होणारी मासळी साठय़ाची उचलही मत्स्यव्यावसायिकांकडून रोखीत होऊ लागल्याने हे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. येथे दोन दिवसांत शंभर कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, बंदरात पर्यटकांनी केलेल्या गर्दीच्या पाश्र्वभूमीवर मासळी विक्रेत्या महिलांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारून सर्वाना दिलासा दिला होता. सहकारी संस्थांनीही नौकांवरील डिझेलच्या साठय़ासाठी पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारून सर्वासमोर आदर्श ठेवला. पण या परिस्थितीचा बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्यांकडून गरफायदा घेण्यात आल्याची चर्चा सध्या येथे सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *