माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी मतदान केले नाही

रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश आणि त्यांच्या पत्नीने राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानच केले नाही. बुश यांनी क्लिंटन किंवा ट्रम्प यांच्यापैकी कोणालाच मतदान केलेले नाही.

रिपब्लिकन नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश आणि त्यांची पत्नी लौरा यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केलेले नाही. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी ‘नोटा’चा वापर केल्याची माहिती बुश यांचे प्रवक्ते फ्रेडी फॉर्ड यांनी दिली आहे. २००१ ते २००९ याकालावधीत अध्यक्षपद भूषणवणारे जॉर्ज बुश आणि त्यांचे वडिल जॉर्ज एच डब्ल्यू बुश या दोघांनीही ट्रम्प यांना मतदान केलेले नाही. जॉर्ज बुश यांचे बंधू जेब बुश हे रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदासाठी रेसमध्ये होते. पण ट्रम्प यांच्यासमोर जेब बुश यांचा दक्षिण कॅरोलिनामध्ये दारुण पराभव झाला होता. ट्रम्प यांनी बुश यांच्यावर इराक युद्धाच्या निर्णयावरुन टीकेची झोड उठवली होती. तेव्हापासून बुश आणि ट्रम्प यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बुश कुटुंबाने ट्रम्प यांच्यासाठी प्रचार करणे टाळले होते. ट्रम्प यांच्याविरोधात बुश कुटुंब हिलरी क्लिंटन यांना मतदान करतील की काय अशी चर्चाही रंगली होती. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *