पती वेळ देत नाही म्हणून पत्नीची आत्महत्या

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. पती वेळ देत नाही म्हणून पत्नीनं आत्महत्या केलीय. औरंगाबादच्या पडेगाव भागातली ही घटना आहे.

प्रवलिका तेरम मनोहर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. ती फक्त 26 वर्षांची होती. तिनं आत्महत्या करण्यापूर्वी गळ्यात फास अडकवून मोबाईवर सेल्फी काढला तो फोटो पतीला पाठवला आणि मग गळफास लावून आत्महत्या केली.

नवरा पूर्वीसारखं प्रेम करत नसल्याने आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोघांचं एका महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *