आर. एम. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.
लोढा समितीच्या सर्व शिफारशी विनाअट सहा महिन्यांत लागू केल्या जाव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलैला दिला होता.
त्यानंतर शिफारशी लागू करण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी याचिका बीसीसीआयसह काही राज्य क्रीडा संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली.
