‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपट अन्य वादांबरोबर रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय-बच्चनच्या हॉट फोटोंमुळेही सर्वत्र चर्चेत आहे. ऐश्वर्या रायचे हेच हॉट फोटो बच्चन कुटुंबाला खटकले असल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणा-या अमिताभ यांनी ‘ए दिल है मुश्किल’बद्दल साधे एक टि्वटही केलेले नाही. त्यावरुन अमिताभ नाराज असल्याची अटकळ बांधली जात आहे.
अमिताभ स्वत: सोशल मिडियावरुन बच्चन कुटुंबाशी संबंधित चित्रपटांचे प्रमोशन करतात. पण ए दिल है मुश्किलबद्दल त्यांनी मौन धारण केले आहे. अॅश आणि रणबीरमधील प्रणय दृश्यांना बच्चन कुटुंबाचा विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आजपर्यंत बच्चन कुटुंबातील एकाही सदस्याने याबद्दल भाष्य केलेले नाही.
