दहशतवादी हल्ल्याचे सावट, मुंबईसह देशभरात हालअलर्ट

मुंबईसह देशातील अतिमहत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी देशात घातपात घडवण्याचा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर, खबरदारी म्हणून गुप्तचर विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *