मंगळावर मिथेन; भूगर्भात जीव असल्याची चाहूल

मंगळावर मिथेन; भूगर्भात जीव असल्याची चाहूल

आंतरराष्ट्रीय संशोधकांना मंगळावरील अवशेषांमध्ये मिथेन असल्याचा माग मिळाला आहे. मंगळाच्या पृष्ठभागाखालील काही बाबींवरून तिथे जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेला पुष्टी देणारे संकेत यामुळे मिळाले आहेत.

या अभ्यासाकरीता संशोधकांनी मंगळावरील ज्वालामुखीच्या खडकांच्या सहा अवशेषांचे नमुने तपासले. सर्व सहा नमुन्यांमध्ये मिथेन समाविष्ट होते. या खडकाचा चुरा करून आणि मास स्पेक्ट्रोमीटरच्या माध्यमातून गॅस सोडून मिथेन मोजण्यात आले.
मंगळाच्या पृष्ठभागाखालील प्राथमिक अवस्थेतील जीवांकडून या मिथेनचा खाद्याचा स्त्रोत म्हणून वापर करण्यात आला असावा, अशी शक्यता या संशोधनामुळे ध्वनित होते. पृथ्वीवर ठराविक वातावरणामध्ये अल्पजीवी असणारे सूक्ष्मजीव मिथेनचा खाद्य म्हणून वापर करतात.

मंगळाच्या पृष्ठभागाखाली जीव राहू शकतात का याबद्दल संधोधन व प्रयोग करताना खगोल-जीवशास्त्रज्ञांना वरील संशोधनाचा उपयोग होईल, असे या संशोधनाचे अमेरिकेतील येल विद्यापीठातील सहलेखक शॉन मॅकमोहन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *