केएफसी चा किळसवाणा प्रकार, ‘फ्राय चिकन’ऐवजी दिला उंदीर फ्राय!

केएफसी चा किळसवाणा प्रकार, ‘फ्राय चिकन’ऐवजी दिला उंदीर फ्राय!

कॅलिफोर्निया- ‘केएफसी‘मध्ये एका नागरिकाने ‘फ्राय चिकन‘ची मागणी केली. परंतु, त्याला उंदीर फ्राय दिल्याची तक्रार त्याने केली आहे.

येथील वॉट्‌स भागात राहणारे डिवोरीइज डिक्‍सन यांनी शुक्रवारी फेसबुक पेजवर फ्राय झालेला उंदीर अपलोड केला आहे. तेव्हापासून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून फ्राय झालेला उंदीर चांगलाच फिरू लागला आहे. डिक्‍सन यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, ‘केएफसी‘मधून ‘फ्राय चिकन‘ची मागणी केली होती. परंतु, मला फ्राय उंदीर मिळाला. ही गोष्ट व्यवस्थापकाच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी माफी मागितली. मला आता वकिलाची गरज आहे. परंतु, ‘फास्ट फूड‘ न खाणेच योग्य आहे.‘

‘सोमवारी याबाबतचा व्हिडिओही अपलोड केला आहे. ‘फ्राय चिकन‘ नसून तो फ्राय उंदीर असल्याचे मान्य केले आहे,‘ असेही डिक्‍सन यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *