पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राच्या निर्मितीबाबत आजपर्यंत अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले आहे. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या ताज्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर दुसरा ग्रह येऊन धडकल्याने चंद्राची निर्मिती झाली आहे. या संशोधनामुळे चंद्राच्या उत्पत्तीसंबंधी प्रचलित असलेल्या परिकल्पनेला एकप्रकारे पुष्टीच मिळते.
नव्या संशोधनानुसार चंद्राच्या जमिनीवर असलेला लोहाचा जाड थर आणि अन्य दुसर्या पुराव्यामुळे दीर्घकाळापासून चालत आलेल्या या परिकल्पनेला पाठबळच मिळते. संशोधकांच्या मते चंद्राची उत्पत्ती मूळत: पृथ्वीपासूनच झाली आहे. अवकाशात पृथ्वी आणि विशाल तुकडे एकमेकावर आदळले आणि चंद्राची उत्पत्ती झाली.
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीशी संबंधित असलेल्यल मेलिस लंदेहू यांनी सांगितले की, आमचे संशोधन हे परिकल्पनेलाच बळ देते. तर याच युनिव्हर्सिटीचे आणखी एक संशोधक प्रो. पीटर ओल्सन यांच्या मते ही एक पृथ्वीच्या उपग्रहाच्या उत्पत्तीसंबंधी प्रचलित शास्त्रीय परिकल्पना आहे. मात्र, हे असेच झाले आहे, हे पूर्ण सिद्ध झालेले नाही. चंद्राची उत्पत्ती कशी झाली, यावर गेली अनेक वर्षे संशोधन सुरू आहे. मात्र, जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये यावर एकमत झालेले नाही. यामुळे यावर आणखी संशोधनाची गरज असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. तरच चंद्राच्या उत्पत्तीवर प्रकाश पडेल.