नितेश राणे यांच्या ‘स्वाभिमान’ संघटनेने आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी टॅक्सीसंप पुकारला होता. या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र, या संपाचा राव यांच्या संघटनेने धसका घेत एक दिवसाच्या अंतराने दुसरा संप मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेच्या माथी मारला. रिक्षाचालक-मालकांना सामाजिक सुरक्षा, मोबाइल अॅप टॅक्सीला विरोध, हकीम समितीची फेररचना आदी जुन्याच मागण्या पुन्हा रेटत राव यांच्या ‘मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन’ने संपाची हाक दिली. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यांवरून रिक्षा-टॅक्सी गायब झाल्या होत्या. राज्यातील अन्य महानगरांमध्येही थोड्याफार फरकाने हिच परिस्थिती होती. आजच्या संपाने मुंबई-ठाण्यात तर प्रवशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, मुंबई आणि ठाण्यात शरद राव यांच्या रिक्षा-टॅक्सी युनियनची चांगलीच पकड आहे. त्यामुळे शिवसेनेचा सहभाग नसतानाही राव यांनी पुकारलेला संप यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

