दोन बालकांचा बुडून मृत्यू

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत खोलीकरण करण्यात आलेल्या खड्डयातील साचलेल्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी नरखेड तालुक्यातील खंडाळा येथे घडली.
प्रज्वल विलास महल्ले (१२) व यश बंडू क्षीरसागर (११) असे मृत बालकांचे नाव आहे. खंडाळा येथे राजना रोडलगत शंकर मुंदाफळे यांच्या शेताजवळील खडकपेठ नाल्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने सदर नाला पाण्याने तुडूंब भरले होते. हे पाहण्यासाठी प्रज्वल आणि यश गेले होते. वाकून पाहत असताना दोघांचेही पाय घसरल्याने ते पडले. वाचविण्यासाठी दोघेही हाका मारत होते. पण, परिसरात कुणीही नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने खंडाळा गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *