थरार पसरवण्यासाठी तिने पसरवली उरणची अफवा

पठाणी पेहरावात चार ते पाच जण संशयीतरित्या फिरताना पाहिल्याचं उरणमधल्या एका 12 वर्षांच्या मुलीनं सांगितलं होतं. पण मुलीनं थरार पसरवण्यासाठीच ही अफवा पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका तपास अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. मुलीनं चूक कबूल केल्यानंतर तिला समज देण्यात आला आणि सोडून देण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

मुलीनं संशयीत दिसल्याचा दावा केला होता. यानंतर यंत्रणांनी या संशयितांना शोधण्यासाठी चोख तपास केला. या संशयितांची स्केचही जारी केली. एवढं करूनही कोणतेच संशयित सापडले नसल्यामुळे आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी या मुलीला चौकशीसाठी बोलावलं, तेव्हा तिनं हा प्रकार सांगितला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *