‘राफेलचा वापर चीन, पाक विरोधात’

फ्रान्सकडून भारत खरेदी करत असलेली राफेल ही लढाऊ विमाने पाकिस्तान आणि चीनच्या विरोधात वापरू शकेल. अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेली ही विमाने पाकव्याप्त काश्मीरनजीक, तसेच चीनच्या सीमेनजीक तैनात केली जातील.
अण्वस्त्र वाहून नेण्याच्या क्षमतेसाठी राफेल विमाने प्रसिद्ध आहेत. भारताने फ्रान्ससोबत ही विमाने खरेदी करण्यासाठी करार केला आहे. भारत ३६ राफेल विमाने विकत घेणार आहे. या विमानामुळे भारताची अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता वाढलेली असल्याचे  म्हटले आहे. ही विमाने चीन आणि पाकिस्तानातील टार्गेटवर हल्ला करू शकणार आहेत.
भारताच्या वायुसेनेकडे प्रत्येकी १८ लढावू विमान असलेल्या ३३ स्कार्डन आहेत. पाकिस्तान आणि चीन यांचा धोका लक्षात घेतला तर भारतला अजुन ४५ लढावू विमान लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *