आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुण तलवार घेऊन इमारतीवर चढला

आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुणाने इमारतीचे तीन माळे चढून शेजा-यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घडली आहे. भाईंदरमधील प्लॅन्टेरिया कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे.  धोनी गोपाल असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
गोपालच्या आईचं शेजारच्या महिलेशी भांडण झालं होतं. भांडताना गोपालच्या आईला त्या महिलेने कानाखाली मारली. ही गोष्ट जेव्हा गोपालला कळली तेव्हा त्याचा राग अनावर झाला. आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने घरात धार्मिक विधींसाठी वापरण्यात येणारी तलवार काढली, आणि शेजारच्या महिलेचं घर गाठलं. शेजा-यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिल्यानंतर गोपालचा पारा अजून वाढला.
तलवार घेऊन गोपाल इमारतीच्या भिंतीवरुन तीन माळे चढला आणि त्या महिलेवर खिडकीतून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण लोखंडी सळ्यांचा अडथळा आल्याने तो हल्ला करु शकला नाही. त्यानंतर त्याने खिडकीच्या काचा फोडल्या आणि खाली उतरला. हा सर्व  प्रकार पाहिल्यानंतर सर्व शेजारी इमारतीखाली जमा झाले होते. लोकांनी गोपालला पोलिसांच्या हवाली केलं असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *