निर्मळ सुरांचा अविष्कार…लता मंगेशकर

  • संगीत, स्वरसाधना, सरस्वती, आणि हृदयाचा ठाव घेणारी गाणी अशा शब्दांची विचारणा झाली की, ही सारी शोधमोहिम एकाच नावावर येऊन थांबते. ते नाव म्हणजे लता मंगेशकर. लतादीदी म्हणजे भारतीय चित्रपट संगीत आणि एकूणच संगीत विश्वाला लाभलेली एक दैवी देणगी आहे असेच म्हणावे लागेल. कुटुंबातूनच संगीताचा वारसा लाभलेल्या लतादीदींनी जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळ संगीतक्षेत्रामध्ये आपले योगदान दिले आहे. गायकीचा वारसा असलेल्या आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडामध्ये लतादीदी सर्वात थोरल्या. लतादीदींचा आज ८७ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी प्रत्येकजण त्यांना शक्य त्या परिने शुभेच्छा देत आहे. अशा या स्वरसम्राज्ञीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या जीवनातील काही क्षणांवर टाकलेला हा धावता दृष्टीक्षेप...
संगीत, स्वरसाधना, सरस्वती, आणि हृदयाचा ठाव घेणारी गाणी अशा शब्दांची विचारणा झाली की, ही सारी शोधमोहिम एकाच नावावर येऊन थांबते. ते नाव म्हणजे लता मंगेशकर. लतादीदी म्हणजे भारतीय चित्रपट संगीत आणि एकूणच संगीत विश्वाला लाभलेली एक दैवी देणगी आहे असेच म्हणावे लागेल. कुटुंबातूनच संगीताचा वारसा लाभलेल्या लतादीदींनी जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळ संगीतक्षेत्रामध्ये आपले योगदान दिले आहे. गायकीचा वारसा असलेल्या आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडामध्ये लतादीदी सर्वात थोरल्या. लतादीदींचा आज ८७ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी प्रत्येकजण त्यांना शक्य त्या परिने शुभेच्छा देत आहे. अशा या स्वरसम्राज्ञीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या जीवनातील काही क्षणांवर टाकलेला हा धावता दृष्टीक्षेप…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *