विश्वसंचार मंगळावर आहे विपूल प्रमाणात हैड्रोजन वायू

मंगळावर एकेकाळी झालेल्या शक्‍तिशाली भूकंपावेळी अनेक टेकड्यांमध्ये आपसात घर्षण होऊन निर्माण झालेल्या पर्वतांमध्ये भरपूर प्रमाणात हैड्रोजन वायू अडकला आहे. भूगर्भीय हालचालीमुळे या ग्रहावर संभाव्य जीवनासाठी आवश्यकते इतका हैड्रोजन वायू उपलब्ध होऊ शकतो. हा दावा एका ताज्या संशोधनात करण्यात आला आहे.

अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी स्कॉटलंडच्या किनारपट्टी  भागातील आऊटर हॅब्रिडेसमधील सक्रिय फॉल्टलाईनजवळ असलेल्या पर्वतांचा सखोल अभ्यास केला. येलचे जिऑलॉजिकल शास्त्रज्ञ सीन मॅकमोहन यांनी सांगितले की, यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये असे नमूद करण्यात आले होते की, ज्यावेळी शक्‍तिशाली भूकंप होतो, तेव्हा काहीवेळा पर्वतांमध्ये घर्षण होते. या प्रक्रियेतून हैड्रोजन वायू तयार होतो. यामुळे आमच्या मते सक्रिय फॉल्टलाईनजवळ सूक्ष्म जीवांच्या विकासास मदत मिळते.

दरम्यान, या संशोधनाशी संबंधित असलेले स्कॉटलंड एबरडिन युनिव्हर्सिटीतील संशोधक जॉन पर्नेल यांनी सांगितले की, नासाने 2018 मधील इनसाईट मिशनदरम्यान मंगळावरील भूकंपासंबंधीच्या प्रक्रियांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून रोचक माहिती आणि आकडेवारी मिळण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. काहीही असले तरी मंगळासंबंधीचे हे संशोधन महत्त्वाचे ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *