मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळली, 16 जखमी

मुंबईच्या मुलुंड परिसरात भिंत कोसळल्याची दुर्घटना घडलीये.यात एक ठार तर 16 जण जखमी झालेत.

मुलुंडमधील शास्त्रीनगर भागात संरक्षक भिंत कोसळलीये. या दुर्घटनेत 17 वर्षांचा मुलगा ठार झालाय तर 16 जण जखमी झालेत. 3 ते 4 घरांवर ही संरक्षक भिंत कोसळली.

मुलुंडच्या शास्त्रीनगर भागात रात्री एका इमारतीची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत 17 वर्षांच्या मुलाचा भिंतीखाली चिरडून मृत्यू झाला आहे.

मुसळधार पावसामुळे मुलुंडमधील शास्त्रीनगर भागात घरांवर भिंत कोसळून जवळपास 11 जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते. ही भिंत टेकडीजवळ असल्याने कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही तासांत राज्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *