‘पीएफ’साठी कंपनीचे हेलपाटे बंद, लवकरच ऑनलाईन प्रक्रिया

पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंडमधील पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला वारंवार कंपनीचे हेलपाटे घालण्याची आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची गरज नाही. येत्या डिसेंबर महिन्यापासून पैसे ऑनलाईन काढता येण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

डिसेंबर महिन्यापासून प्रायव्हेट कंपनीतील कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीतील पैसा ऑनलाईन काढता येण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये चकरा मारण्याऐवजी घरबसल्या हा पैसा अकाऊण्टमध्ये ट्रान्सफर करता येणार आहे.

पीएफ ऑनलाईन काढता येण्याच्या दृष्टीने ‘ईपीएफओ’कडून सध्या डाटा जमा करण्याचं काम सुरु आहे. यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आहे. याच्या मदतीने कर्मचाऱ्यांना पीएफ ऑनलाईन काढता येईल.

ईपीएफओचे सध्या 3.6 कोटी अॅक्टिव्ह अकाऊंटधारक आहेत. त्यामुळे ऑनलाईन पीएफ काढण्याची प्रक्रिया सुरु होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.

सध्या पीएफ काढण्याची प्रक्रिया काहीशी किचकट मानली जाते. महत्त्वाच्या कागदपत्रांसह कंपनीत जावं लागतं. फॉर्म 10C आणि फॉर्म 19 भरावे लागतात. यूएएन नंबरसह हे फॉर्म कंपनीत जमा करावे लागतात. त्यानंतर 15 ते 30 दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाऊण्टमध्ये जमा
होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *