मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१२ साली अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, याचा सर्वांनाच धक्का बसला. मात्र, सचिनने निवृत्ती घेतली नसती तर त्याला संघातूनच काढून टाकले असते, असा गौप्यस्फोट क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे.
सचिनच्या निवृत्तीमागे नेमके काय कारण असेल, याची चर्चा होत होती. मात्र, संदीप पाटली यांच्या गौप्यस्फोटाने अधिकच चर्चा रंगली आहे. बोलताना संदीप पाटील यांनी हा खुलासा केला. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याआधी निवड समितीने सचिनचे म्हणणे ऐकून घेतले होते, असे संदीप पाटील यांनी सांगितले
१२ डिसेंबर २०१२ रोजी आम्ही सचिनची भेट घेऊन तुझी वाटचाल काय असेल, तसेच तुझ्या मनात काय आहे, अशी विचारणा केली. माझ्या मनात निवृत्तीचा विचार नसल्याचे उत्तर सचिनने दिले होते. मात्र, निवृत्तीबाबत सचिनबाबत निवड समितीचे एकमत झाले होते. तसे क्रिकेट मंडळाला याबाबत कळवले होते.
दरम्यान, सचिन तेंडुलकर याने जर निवृत्तीचा निर्णय घेतला नसता, तर निवड समितीने त्याला एक दिवसीय संघातून निश्चितच वगळले असते. सचिनवर कोणताही निर्णय लादण्यात आला नव्हता, असेही संदीप पाटील म्हणाले.
दरम्यान, सचिनला निवृत्त होण्यास सांगणे हा निर्णय मलाला पटणारा नव्हता. ही बाब टोचणारी होती. २००व्या कसोटीनंतर मी निवृत्त होईन, असा निर्णय सचिननेच घेतला होता, असे पाटील यांनी सांगितले.
याबाबत सचिनला काय समजायचे ते समजले. त्यानंतर सचिनेने कॉल करुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती संदीप पाटील यांनी यावेळी दिली.