पाटण – पाटण-कोयनानगर रस्त्यावर आज (बुधवार) दुपारी दोन एसटी बसमध्ये झालेल्या धडकेत 30 प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-रत्नागिरी व गुहागर-पुणे या दोन बसमध्ये आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. या अपघातात 30 जण जखमी झाले असून, तिघेजण गंभीर आहेत. जखमींना कराडमधील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.