गुजरातमध्ये प्लास्टिक कारखान्याला – भीषण आग

गुजरातमधील सूरत येथील किम परिसरातील एका प्लास्टिक बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीमुळे संपूर्ण परिसर वेढला गेला असून धुराचे लोट पसरले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे १५ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. जीवितहानीबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. सकाळच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *