न्यूयॉर्कमधील बॉम्बस्फोटात २९ जण जखमी

न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन भागात शनिवारी रात्री झालेल्या बॉम्बस्फोटात २९ जण जखमी झाले.

हा स्फोट ‘हेतूपुरस्पर’ केला असावा, असा संशय महापौरांनी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७१व्या परिषदेसाठी जागतिक नेते येण्यापूर्वी ही घटना घडली आहे.

मॅनहॅटन भागातील चेल्सा उपनगरात एका कच-याच्या डब्यात ही स्फोटके ठेवली होती. हा भाग निवासी व व्यापारी असून पर्यटकांनीही कायम गजबजलेला असतो.

या स्फोटामुळे कार व इमारतींच्या काचा तडकल्या. या स्फोटाची जबाबदारी अजून कोणीही स्वीकारली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *