कावेरी पाणीवाटपावरून सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान बंगळूरमध्ये जाळण्यात 42 बस या एका 22 वर्षीय महिलेने अवघे 100 रुपये आणि एक प्लेट मटण बिर्याणीसाठी जाळल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे.
कावेरी पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत गेल्या आठवड्यात आंदोलन झाले. बंगळूरमध्ये 12 सप्टेंबरला 42 बस जाळण्यात आल्या होत्या. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 22 वर्षीय भाग्या या महिलेने चौकशीदरम्यान अवघे 100 रुपये आणि बिर्याणीसाठी एका ट्रॅव्हल कंपनीच्या बस जाळल्या. तसेच तिने स्थानिक नागरिकांना केपीएन ट्रॅव्हल्स कंपनीच्या गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या बसेस जाळण्यासाठी प्रवृत्त केले होते. भाग्या आपल्या कुटुंबासह गॅरेजजवळच राहत होती. ती मजुरीकरून आपले कुटुंब चालवत होती. तिला काही जणांनी हे आश्वासन देऊन आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले.
बंगळूर पोलिसांनी या आंदोलनप्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे 11 जणांना अटक केलेली आहे. या व्हिडिओमध्ये भाग्या दिसत आहे. सध्या ती पोलिस कोठडीत असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.