गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत वाचविला रुग्णाचा जीव

नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 2012 ला एका खासगी रुग्णालयाने शस्त्रक्रियेसाठी संपर्क साधला. रक्‍तस्त्राव होत असल्याच्या तक्रारीतून महिला रुग्ण दाखल झाली होती. सुरवातीचा काही काळ पोट दुखत होते. मात्र, अचानक रक्‍तस्त्राव सुरू झाला होता. चाचणी अहवाल परीक्षण केल्यानंतर लक्षात आले, की गर्भधारणा गर्भपिशवीत न होता, बाहेरील ट्यूबमध्ये झाली असून, ट्यूब फुटल्याने रक्‍तस्त्राव होत होता. अशा परिस्थितीत रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक होते. शस्त्रक्रियेसाठी रक्‍ताची आवश्‍यकता होती. रुग्णाचा रक्‍तगट दुर्मिळ (ओ निगेटिव्ह) होता. तातडीने रक्‍तपिशवी हवी होती. मात्र, रक्‍तपेढीत उपलब्ध होईलच याची शाश्‍वती नव्हती. यादरम्यान रुग्णाच्या कमी झालेल्या रक्‍तदाबाला औषधोपचाराद्वारे नियंत्रणात ठेवले जात होते. परंतु, तातडीने रक्‍तपुरवठ्याची गरज होती. वेळीच रक्‍त न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची शक्‍यता वाढली होती. यादरम्यान रुग्णालयात त्याच रक्‍तगटाच्या रुग्णासाठी रक्‍तपिशवी आणल्याचे लक्षात आले. क्षणाचा विलंब न करता ते रक्‍त रुग्णाला देण्यात आले आणि महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *