पाकिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, २५ ठार

येथील मशिदीत नमाज पढत असताना झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात २५ जण ठार तर २९ जण जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानजवळच्या अन्बर तालुक्यातील मशिदीत नमाज पठण सुरू असताना एका आत्मघातकी हल्लेखोराने ‘अल्ला हू अकबर’ चा नारा देत स्वत: बॉम्बने उडवून दिले. हा हल्लेखोर मशिदीतच होता, अशी माहिती सहाय्यक राजकीय प्रतिनिधी नावीद अकबर याने दिली.

या स्फोटानंतर बचाव व मदत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना पेशावर व चारसढ्ढा येथील रुग्णालयात नेले.

या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणीही स्विकारलेली नाही. मात्र, पाकिस्तानी तालिबान ही दहशतवादी संघटना न्यायालय, शाळा व मशिदींवर सातत्याने हल्ले करत आहे.

या हल्ल्याप्रकरणी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शोक व्यक्त केला. दरम्यान, लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी दहशतवादाविरोधात कारवाई सुरू राहिल, असे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *