तिन्ही हत्यांचा ‘मास्टर माइंड’ वीरेंद्र तावडे?

गुन्ह्यासाठी आखणी करणे तसेच त्यासाठी आवश्‍यक रसद पुरवणे, असे काम डॉ. वीरेंद्र तावडेकडून होत असल्याची  माहिती तपासात पुढे येत असल्याचे एसआयटीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या संदर्भाने काही पुरावे मिळाल्याने तावडेच ‘मास्टर माइंड’ होता, या निष्कर्षापर्यंत एसआयटी पोचली असल्याचे सांगण्यात येते.
 
दरम्यान, ‘सनातन’ संस्थेच्या ‘थिंक टॅंक’मधील व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे. तावडेच्या पोलिस कोठडीदरम्यान ‘सनातन’च्या साधकांसह इतर सुमारे वीसहून साधकांकडे चौकशी केल्याचेही एसआयटीच्या सूत्रांनी सांगितले. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसाठी सनातनमधील ‘थिंक टॅंक’ सक्रिय होती. त्यातील एक तावडे असल्याचा दावा एसआयटीच्या सूत्रांकडून करण्यात आला. याबाबतचे काही प्राथमिक पुरावेही त्यांच्या हाती मिळाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये पानसरे प्रकणातील तिसरा संशयित आरोपी विनय पवार याच्या कुटुंबीयांकडेही चौकशी केली आहे. पनवेल आणि गोव्यातील ‘सनातन’च्या साधकांकडेही  चौकशी केली आहे. ज्या ठेकेदाराने नार्कोटेक औषधे संस्थेला दिली त्याच्याकडेही चौकशी झाली असून, त्यांचे जबाब नोंदविल्याचेही सूत्रांनी सांगितले. 
 
काही महत्त्वाच्या ठिकाणी तावडेला प्रत्यक्षात घेऊन जाऊन माहिती घेतली आहे. तपासाच्या अनुषंगाने रोज त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *