हुमनाबाद येथे खासगी बसने पेट घेतला, बालकाचा होरपळून मृत्यू, ६ जखमी

मुंबई हैदराबाद महामार्गावर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या हुमनाबादजवळ खासगी बसने अचानक पेट घेतल्याने एका बालकाचा होरपळून मृत्यू तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.
गुरूवारी सांयकाळच्या सुमारास शिर्डी येथून ही खासगी बस ४४ प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे निघाली होती. महाराष्ट्राच्या सीमेजवळ असलेल्या कर्नाटकातील हुमनाबाद येथे आल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. आगीत होरपळून एका बालकाचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. आग समोरच्या बाजूने लागल्याने प्रवाशांना आपतकालीन दरवाज्यातून लगेचच बाहेर जाता आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून बसचा निव्वळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. जखमीतील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व प्रवासी हे हैदराबाद येथील रहिवासी असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *