मोटार दरीत कोसळून अपघात, दोन ठार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणारी सुमो गाडी कोरड्या दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोनजणांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास झाला.

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक पुरुष व एका महिलेचा समावेश असून जखमींमध्ये एक पुरुष, दोन महिला, दोन मुले व एक मुलगी यांचा समावेश आहे. हे सर्वजण गोरेगाव मुंबई येथील असल्याचे खंडाळा महामार्ग पोलिसांनी सांगितले.

अपघातग्रस्त सुमोमधील लोक हे शनी शिंगणापूर या ठिकाणी दर्शनाला गेले होते. तेथून मुंबईकडे परतत असतांना भरधाव वेगात निघालेल्या सुमो गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी सीमेंटचा कठडा तोडून दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.

या अपगातात जखमी झालेल्यांना निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचारासठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *