पॉर्नमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या सनी लिऑनने मुख्य प्रवाहात अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करीत प्रतिष्ठित न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करण्याचा मान मिळविला आहे.
या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉकसाठी निमंत्रित करण्यात आलेली सनी लिऑन ही बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री आहे. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या या फॅशन वीकदरम्यान 8 सप्टेंबर रोजी तिचे रॅम्पवॉक होणार आहे.
प्रसिद्ध डिझायनर अर्चना कोचर यांच्यासाठी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सनी लिऑन रॅम्पवॉक करणार आहे. येथे रॅम्प वॉकची संधी मिळाल्याने सनी लिऑन सध्या खूश आहे. सनीने ट्विट करून या संधीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझं स्वप्न सत्यात उतरणार आहे. मी न्यूयॉर्क फॅशन वीक अर्चना कोचर यांच्यासाठी रॅम्पवॉक करणार आहे.”
चार वर्षांपूर्वी जिस्म 2 चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर अभिनेत्री सनी लिऑनने कमी कालावधीत रसिकांचे लक्ष वेधून घेतले. गुगलवर सर्वाधिक सर्च केली जाणारी व्यक्ती म्हणून सनी लिऑनचे नाव आघाडीवर आहे.
या रॅम्पवॉकच्या संधीबद्दल सनीने फॅशन झिझायनर अर्चना कोचर यांचे ट्विटवरून जाहीर आभारही मानले आहेत. अर्चना कोचर यांनीही आनंद व्यक्त केला. फॅशन वीकचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, त्यासाठी माझे काम सुरू आहे. फॅशन वीकसाठी आता पाच दिवस उरले आहेत.” असे कोचर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.