प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपीवर दोषी

दिल्लीतील प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवारला दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी अंकुर पनवारवर हत्येचा गुन्हा सिद्ध झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्याला बुधवारी सिक्षा सुनावण्यात येणार आहे.

प्रिती राठी २०१३ नौदलाच्या रुग्णालयात नोकरीवर रुजु होण्यासाठी आपल्या कुटुंबासह मुंबईत आली होती. मात्र वांद्रे स्थानकावर २ मे २०१३ रोजी अंकुर पनवारने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. यामध्ये प्रितीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. तर या हल्ल्यात तिचे नातेवाईकही जखमी झाले होते.

प्रितीवर भायखळ्याच्या मसीना रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र पुढील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या कार्डिओ थोरॅसिक सर्जरीची सुविधा या रुगणालयात उपलब्ध नसल्याने तिला १८ मे रोजी बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर ती व्हेन्टिलेटरवरच होती. अॅसिडमुळे तिच्या शरिरातला एकेक अवयव निकामी होत गेला आणि अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली.

कुलाबा येथील मेडिकल कॉलेजमधील लेफ्टनंट पदासाठी देशभरातून १५ मुलींची निवड झाली होती; त्यात प्रीतीचाही समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *