जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा गावात आज (बुधवार) सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हंदवाडा येथे लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तीन जवान जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एक जवानाची प्रकृती गंभीर आहे. या हल्ल्यानंतर परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत असून, नाकाबंदी करण्यात आली आहे.
पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी पहाटे पुँच जिल्ह्यात एलओसीवरील भारतीय चौक्यावर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. आता दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले आहे.