पेट्रोल आणि डिझेलच्या दरापाठोपाठ आता अनुदानित सिलिंडरच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अनुदानित सिलिंडरच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.38 रुपये आणि डिझेलच्या दरात 2.67 रुपये वाढ बुधवारी करण्यात आली होती. आता अनुदानित सिलिंडरचे दरही वाढविण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 13 टक्क्यांनी वाढल्याने तेल कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे. दरवाढ करण्यात आल्याने तेल कंपन्यांवरील ओझे कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ग्राहकांना वर्षभरात अनुदानित 12 सिलिंडर मिळतात. त्यानंतर विनाअनुदानित सिलिंडर ग्राहकांना खरेदी करावे लागतात.