योगेश्वरला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता

रिओ आॅलिम्पिकमध्ये पहिल्याच लढतीत पराभव झाल्यानंतर टीकेचा सामना करावा लागलेला मल्ल योगेश्वर दत्तला लंडन आॅलिम्पिकसाठी रौप्य ऐवजी सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमधील ६० किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या योगेश्वरला सुवर्णपदक दिले जाईल. रौप्य जिंकणारा रशियाचा मल्ल बेसिक कुडुकोव्ह याच्यानंतर आता सुवर्णपदक विजेता तोगरुल असगारोव्ह हा देखील डोपिंगध्ये ‘फेल’ झाल्याने योगेश्वरला सुवर्णपदक बहाल करण्यात येईल.

योगेश्वर लंडन आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच मल्ल ठरेल. लंडनमध्ये सुशीलकुमारने ६६ किलोगटात रौप्यपदक जिंकले होते.

लंडनमध्ये कुडुकोव्ह हा सुवर्णपदकाच्या कुस्तीत अझरबैझानचा तोगरुल असगारोव्ह याच्याकडून पराभूत झाला होता. तो चार वेळेचा विश्वविजेता तसेच २००८च्या बीजिंग आॅलिम्पिकचा कांस्यविजेता होता. नंतर रशियात झालेल्या कार अपघातात वयाच्या २७ व्या वर्षी त्याचे निधन झाले. कुडुकोव्ह पाठोपाठ असागारोव्ह डोपिंगध्ये ‘फेल’ झाला आहे. योगश्वर दत्तचीदेखील डोपिंग चाचणी केली जाणार असून तो पास झाल्यास सुवर्णपदकावर त्याचे नाव कोरण्यात येईल. ६० किलोगटात योगेश्वरला रौप्यपदक मिळाल्यानंतर त्याच्याकडून कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत झालेला उत्तर कोरियाचा रिजोंग मियोंग हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. मात्र योगेश्वरला सुवर्णपदक मिळाल्यास रिजोंग मियोंगला रौप्य मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *