नाशिकजवळ तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

जवळील पंचवटी भागातील म्हसरूळ येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 6 पैकी 2 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व ओमकार कुलकर्णी (वय 16) आणि रोहित अनिल कोलते (वय 17) या दोघांचा म्हसरुळ येथे पाण्यात बुडून मृत्यु झाला. ही शुक्रवारी घटना रात्री उघडकीस आली. या दोघांना पाण्याबाहेर काढल्यानंतर तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे दोघेही म्हसरूळ येथील कलानगर भागातील रहिवाशी आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांत पाण्यात बुडून 6 हून आधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *