हिंदू मंदीर उधळण्याचा इसिसचा कट मलेशियात

मलेशियातील बातू गुंफेतील प्रसिद्ध हिंदू मंदीर उद्ध्वस्त करण्याचा कट रचणाऱ्या इस्लामिक स्टेटच्या तीन दहशतवाद्यांना अटक करून हल्ल्याचा कट उधळण्यात आला. मलेशियात 
 
दहशतवादविरोधी विभागाच्या विशेष शाखेने 27 ते 29 ऑगस्टदरम्यान या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. क्रूर कृत्यांसाठी कूप्रसिद्ध असणाऱ्या इसिसचे हे दहशतवादी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंदिरासह मनोरंजन केंद्र आणि पोलिस ठाण्यावर हल्ला करणार होते. 
 
सेलांगोर येथे 27 ऑगस्ट रोजी एका वीसवर्षीय संशयिताला पकडण्यात आले. त्याच्याकडून के-75 ग्रेनेड व एका पिस्तुलासह बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्याला ही शस्त्रे मध्यस्थाकडून मिळाली. इतर दोन संशयितांना 29 ऑगस्ट रोजी पहांग शहरात अटक केली. हल्ले केल्यानंतर सीरियाला पळून जाण्याचा त्यांची योजना होती, असे खालीद यांनी सांगितले. या तिघांपैकी एक ट्रकचालक व दुसरा खाटीक असून, ते तिघे इस्लामिक स्टेटचा मलेशियन दहशतवादी मोहंमद जेदी याच्या इशाऱ्यानुसार काम करीत होते. गेल्या जूनमध्ये क्वालालंपूरजवळील बारमध्ये ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *