मीरा रोडमध्ये एका माथेफिरु तरुणाने तरुणीवर चाकूने वार केला. एवढयावर न थांबता तो तरुणीच्या घरी गेला आणि तिच्या आईवरही वार करण्याचा प्रयत्न केला. जखमी तरुणीला रूग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती स्थिर आहे.
हल्लेखोराचं नाव अनिल असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याची प्रेयसी भावना सिंह मीरा रोडच्या दीपा बारमध्ये बारबाला म्हणून काम करते. भावना ‘शांती पार्क’मधून जात असताना दबा धरुन बसलेल्या अनिलने तिच्यावर चाकूने हल्ला केला.
तिने आरडाओरड केल्यानंतर तिथं जमलेल्या नागरिकांवरही त्यानं चाकू उगारला. नागरिकांनी त्यांच्यावर दगडफेक केल्यानंतर अनिल पळून गेला. जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती स्थिर आहे. माथेफिरु अनिल एवढयावर न थांबता तो तरुणीच्या घरी गेला आणि तिच्या आईवरही वार केला. सोसायटीतल्या रहिवाशांनी अनिलला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

