नाशिक-पुणे सीप्लेन उड्डाणाचा मुहूर्त लांबला, खराब हवामानामुळे उदघाटन लांबणीवर

नाशिक-पुणे सीप्लेन उड्डाणाचा मुहूर्त लांबला, खराब हवामानामुळे उदघाटन लांबणीवर

खराब हवामानामुळं नाशिक-पुणे विमानसेवेचं आज होणारं उद्घाटनं लांबणीवर पडलं आहे. मेहेर कंपनी प्रशासनानं ही माहिती दिली आहे. त्यामुळं आज होणारं उद्घाटन उद्या होण्याची शक्यता आहे.

नाशिक-पुणे दरम्यान पहिली विमान सेवा सुरू होत आहे. या सेवेमुळं दोन्ही शहरातलं अंतर अवघ्या ५० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. दिवसातून दोन फेऱ्या पुण्यासाठी तर पुण्याहून नाशिकसाठी राहणार आहेत.

नाशिक ते पुणे सेवेसाठी ५ हजार ९९९ रुपये तिकिटाचा दर जाहीर करण्यात आला आहेत. तर जुलैपासून या दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

नाशिक-पुणे दरम्यान आजपासून पहिली विमान सेवा सुरू होत आहे. या सेवेमुळं दोन्ही शहरातलं अंतर अवघ्या ५० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

दिवसातून दोन फेऱ्या पुण्यासाठी तर पुण्याहून नाशिकसाठी राहणार आहेत. मेरिटाईम एनर्जी हेलि एअर सर्व्हिस लिमिटेड या कंपनीनं नाशिक ते पुणे ही सीप्लेन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक ते पुणे सेवेसाठी ५ हजार ९९९ रुपये तिकिटाचा दर जाहीर करण्यात आला आहेत. तर जुलैपासून या दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *