भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडनमधील घर खरेदी करण्याची केंद्र सरकारची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२० मध्ये वास्तव्य केलेले घर केंद्र सरकारने ४० लाख पाउंड (४० कोटी) खर्च करून ताब्यात घ्यायचे ठरवले आहे.
या घराबाहेर ‘डॉ. आंबेडकर सन १९२१-२२ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेण्यासाठी आले असता येथे वास्तव्यास होते’ असे लिहिण्यात आले आहे.
भारतीय दूतावासाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, ‘राज्य सरकारने ही वास्तू ताब्यात घेण्याचे ठरवल्यानंतर त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यावर या वास्तूची देखरेख महाराष्ट्र सरकार करेल.’

