तेलंगणामध्ये बस कालव्यात कोसळली, 9 जणांचा मृत्यू

तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात खासगी बस पुलावरुन कालव्यात कोसळून अपघात झाला आहे. सोमवारी पहाटे हा अपघात झाला. अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस हैद्राबादहून खम्मम जिल्ह्याकडे चालली असताना हा अपघात झाला. खम्माम जिल्ह्यामधीलच नागार्जूनसागर कालव्यात बस कोसळली आहे.
बसमध्ये एकूण 31 प्रवासी प्रवास करत आहे. खम्मम जिल्ह्यातील काकिनाडा येथे बस चालली असताना नागार्जूनसागर कालव्याजवळ पोहोचल्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बसचा अपघात झाला. अपघातानंतर पोलीस आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बस कालव्यात कोसळल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. नऊ जणांचा मृत्यू झाला हा आकडा अजून वाढण्याची भीती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *