समुद्रात दोन मच्छिमार बोटी बुडाल्याची घटना घडली आहे. उत्तरेला 70 नॉटिकल मैल अंतरावर उंबरगावजवळ या बोटी बुडाल्या असून बोटींमधील 15 मच्छिमारांना वाचवण्यात यश मिळालं आहे. रविवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. हिमसागर आणि कृष्ण सागर अशी या बोटींची नावे आहेत. बोटी बुडाल्याची माहिती मिळताच तटरक्षक दलाने बचावकार्यासाठी जहाज पाठवले होते. पण तोपर्यंत स्थानिक मच्छिमारांनी धाडसाने सर्वांची सुटका केली होती.
